Type Here to Get Search Results !

करगणीत दिव्यांगाना जीवे मारण्याची धमकी : आटपाडी पोलिसात गुन्हा दाखलकरगणीत दिव्यांगाना जीवे मारण्याची धमकी  

माणदेश एक्सप्रेस न्युज 

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथे दोन दिव्यांगांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांचा अपमान केल्याबद्दल आरोप विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी सुनील दिलीप लांडगे हे घरी असताना यातील आरोपी कल्पना यशपंत कांबळे, बाबु यशवंत कांबळे, कबीर यशवंत कांबळे (सर्व रा.करगणी ता.आटपाडी) यांनी संगणमत करुन फिर्यादी यांचे घरी येवुन गाडी 'भाडयाचे कारणावरुन, आमचे तुम्ही घर जाळले असे म्हणुन शिवीगाळी करुन फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ उमेश याने आईला कशाला शिवीगाळी करत असता असे म्हणत असताना फिर्यादी व फिर्यादीचा भाउ हे दिव्यांग असल्याचे माहीत असताना देखील त्यांना सांगोल्याचे गुंड आणुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दिव्यांग असल्याचे माहिती असून देखील त्यांचा अपमान केला आहे. 


याप्रकरणी फिर्यादीच्या फिर्यादीनुसार आरोपी कल्पना यशपंत कांबळे, बाबु यशवंत कांबळे, कबीर यशवंत कांबळे यांच्यावर आटपाडी पोलिसात कलम ५०४, ५०६, ३४ तसेच अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ चे कलम ९२, ९३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies