Type Here to Get Search Results !

Video : कर्नाटकात राहुल गांधींचा हटके अंदाज : डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून मारला फेटफटका : नागरिकांशी साधला संवादकर्नाटकात राहुल गांधींचा हटके अंदाज : डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून मारला फेटफटका : नागरिकांशी साधला संवाद

माणदेश एक्सप्रेस न्युज 

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेसाठी प्रचार मोहीम जोरदार सुरु असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून फेरफटका मारला आहे. तर प्रचाराच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये राहुल गांधी ठिकठिकाणी भेटी देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. अशातच राहुल गांधी डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून फेरफटका मारत ते थांबलेल्या हॉटेलमध्ये पोहचले. राहुल गांधींनी डिलीव्हरी बॉयबरोबर दुचाकीवरून २ किलोमीटर प्रवास केला. त्यापूर्वी राहुल गांधींनी एका चिमुरड्याशी आपुलकीने चर्चा करत, फोटो काढल्याचं व्हिडीओत दिसत आहे.


दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बंगळुरूमध्ये आहेत. पंतप्रधान मोदींनी शनिवारी ( ६ मे ) २६ किलोमीटरचा रोड शो केला होता. त्यानंतर आजही पंतप्रधानांनी १० किलोमीटरचा रोड शो केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक मोठ्या संख्येने फुलं घेऊन उभे होते.


“मागील तीन वर्षात कर्नाटकात चोरीचे सर्व उच्चांक मोडले आहेत. देशातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार कर्नाटकातील आहे. कंत्राटदारांनी पंतप्रधानांना पत्र लिहित ४० टक्के कमिशनची माहिती दिली होती. पण, आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर भाष्य केलं नाही. पंतप्रधान कर्नाटकात येतात, मात्र भ्रष्टाचाराबद्दल एकही शब्द बोलत नाहीत. भ्रष्टाचाराविरुद्ध काय पावले उचलली, याबद्दल कर्नाटकातील तरुणांना पंतप्रधानांनी माहिती दिली पाहिजे,” असे आव्हान राहुल गांधींनी दिलं आहे.


 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies