Type Here to Get Search Results !

World Cup 2023: दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजवर आली नामुष्की



World Cup 2023 WI vs SCO : दोनवेळचा वर्ल्डकप चॅम्पियन वेस्ट इंडीजवर पात्रता फेरीतूनच बाहेर पडण्याची वेळ आली आहे. विश्वचषक पात्रता फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात स्कॉटलंडने विंडीजचा सात गडी राखून पराभव केला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ कोणत्याही एकदिवसीय विश्वचषकाचा भाग असणार नाही.


झिम्बाब्वे येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा सात विकेट राखून पराभव केला. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने स्कॉटलंडला १८२ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी ३९ चेंडू राखून पूर्ण केले.

 

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाही. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आली. वेस्ट इंडिजचा संघ ४३.५ षटकात केवळ १८१ धावांवर आटोपला. विंडीजकडून, फक्त जेसन होल्डर आणि रोमॅरियो शेफर्ड यांना थोडा संघर्ष करता आला. होल्डरने ७९ चेंडूंत ४५ धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याचवेळी शेफर्डने ४३ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली. स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकमुलेनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर ख्रिस सोल, मॉक वॅट आणि ख्रिस ग्रीव्हज यांना प्रत्येकी दोन गडी बाद करण्यात यश मिळाले.


प्रत्युत्तरात स्कॉटलंडने ४३.३ षटकांत लक्ष्य गाठले. यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू क्रॉस ७४ धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी ब्रँडन मॅकमुलेनने ६९ धावांची खेळी केली. क्रॉसने आपल्या खेळीत सात चौकार मारले. त्याचवेळी मॅकमुलनने आठ चौकार आणि एक षटकार मारला.


 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies