Type Here to Get Search Results !

ओळख किव्हा लग्न लपवून संबंध ठेवल्यास ठरणार गुन्हा; आरोपीला मिळणार 10 वर्षांची शिक्षा; सरकारचा नवीन कायदा

 


विवाहित असल्याची माहिती लपवून अथवा आपली खरी ओळख लपवून एखाद्या महिलेसोबत लग्न करणे अथवा तिच्या सोबत संबंध प्रस्थापित करणे भारतीय न्यायिक संहितेनुसार गुन्हा ठरणार आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 69 नुसार असे करणे छळ मानले जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकेल.


कायदेविषयक संसदीय समितीने या संदर्भात एक अहवाल तयार केला असून या संदर्भात विधेयकही आणले जाऊ शकते. यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने लग्न करण्यासाठी आपली ओळख लपवली अथवा संबंध प्रस्थापित करण्यासाठी असे केले, तर तो बलात्कार मानला जाणार नाही, मात्र छळ मानला जाईल. 


अशा प्रकरणांत 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतून करण्याची तयारी सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, रोजगार देणे, प्रमोशन अथवा लग्नाचे आश्वासन देऊन ओळख लपवून लग्न करणे छळ मानला जाईल, असे या सेक्शनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies