Type Here to Get Search Results !

मज्जेशीर: ‘आली आली गं भागाबाई’ गाणं जिंकतंय सर्वाची मन; एकूण तुम्हीही खुश व्हाल

 


मराठी मनोरंजन विश्वातील विनोदवीर, प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री यांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि लक्ष वेधून घेणारा डान्स असं सारं धमाल कॉम्बिनेशन सध्या एका गाण्यातून समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आली आली गं भागाबाई गाण्यानं नेटकऱ्यांना, चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.


आली आली गं भागाबाई हे गाणं आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय आहे. त्यात चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर सहभागी झालेले दिसतात. जुन्या अंदाजातील ते गाणं ज्या पद्धतीनं नव्या रुपात अन् थाटात प्रेक्षकांसमोर आले आहे त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.


एखाद्या गीताची जादू अथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण करून देत असते. अनेक चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात  असल्याचे आपण बघतो. असंच  एक जोरदार गीत आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ या धमाल  चित्रपटातून आपल्या  भेटीला आलं आहे.  


प्रसाद खांडेकर दिग्दर्शित‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात ‘आली आली गं भागाबाई’ हे पारंपरिक गीत नव्या ढंगात सादरकेलं आहे. नुकतंच हे गीत प्रदर्शित झालं असून या गीताला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.  हे गीत रोहन प्रधान यांनी गायलं आहे.


 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies