Type Here to Get Search Results !

धक्कादायक : इन्स्टाग्रामवर मैत्री करणे तरुणीला पडले चांगलेच महागात!

   


मुंबई :  इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या तरुणाला भेटणे अल्पवयीन मुलीला भलतेच महागात पडले आहे.  पीडित मुलगी दादरमध्ये कुटुंबासोबत राहते.

 

१९ वर्षीय आरोपीसोबत तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाल्यानंतर आरोपीने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.


इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या या तरुणाने १७ ऑक्टोबरला दुपारी साडे तीनच्या सुमारास तिला आपल्या घरी भेटायला बोलावले. 

 

येथे आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला विरोध केला. मात्र आरोपीने तिला कंबरपट्ट्याने मारहाण करत तिच्यासोबत असलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केला आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे.




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies