Type Here to Get Search Results !

World Cup 2023 : न्यूझीलंडचा चार विकेटने पराभव, विराट कोहलीची 95 धावांची झुंजार खेळी : टीम इंडियाचा सलग पाचवा विजय




विश्वचषकात भारताने न्यूझीलंडचा चार विकेटने पराभव केला. विराट कोहलीची 95 धावांची झुंजार खेळी केल्याने टीम इंडियाला सलग पाचवा विजय मिळविता आला. आता गुणतालिकेत भारताने अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. या विजयासह भारताने सेमीफायनलमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. 


274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 11 षटकात 71 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 40 चेंडूत 46 धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्माने चार चौकार आणि चार षटकार लगावले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिलही माघारी परतला. शुभमन गिल याने 31 चेंडूमध्ये पाच चौकारांच्या मदतीने 26 धावांचे योगदान दिले.  


शुभमन गिल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीने अय्यर आणि केएल राहुल यांच्यासोबत चांगली भागिदारी केली. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यामध्ये चौथ्या विकेटसाठी 49 चेंडूत झटपट 52 धावांची महत्वाची भागीदारी झाली. तर राहुल आणि विराट कोहली यांच्यामध्ये पाचव्या विकेटसाठी 64 चेंडूमध्ये 54 धावांची भागीदारी झाली.  श्रेयस अय्यरने 29 चेंडूमध्ये सहा चौकारांच्या मदतीने 33 धावांचे महत्वाचे योगदान दिले. तर केएल राहुल याने 35 चेंडूमध्ये तीन चौकारांच्या मदतीने 27 धावा जोडल्या. राहुल आणि अय्यर यांनी चांगली सुरुवात केली, पण त्यांना या खेळीचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. 


सूर्यकुमार यादव दोन धावांवर धावबाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण विराट कोहलीने रविंद्र जाडेजाच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहली आणि जाडेजा यांच्यामध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. 


विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा यांनी 83 चेंडूमध्ये 78 धावांची भागीदारी केली. कठीण परिस्थितीमध्ये दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी झाली. रविंद्र जाडेजाने नाबाद 39 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने तीन चौकार आणि एका षटकारांचा समावेश होता. जाडेजाने मॅचविनिंग चौकार लगावला. न्यूझीलंडकडून लॉकी फर्गुसन याने 8 षटकात 63 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट, मॅट हेनरी आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 


तत्पूर्वी, रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. सलामीवीर डेवॉन कॉन्वे (०) आणि विल यंग (१७) स्वस्तात बाद झाले. राचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल जोडीने १५९ धावांची भागीदारी केली. राचिन ७५ धावांवर बाद झाला. त्यानंतर डॅरेल मिचेलला इतरांची अपेक्षित साथ मिळाली नाही. ग्लेन फिलिप्स (२३) वगळता सारेच एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. 


टॉम लॅथम (५), मार्क चॅपमन (६), मिचेल सँटनर (१), मॅट हेन्री (०) आणि लॉकी फर्ग्युसन (१) स्वस्तात बाद झाले. मिचेलने मात्र एकाकी झुंज सुरू ठेवली. त्याने ९ चौकार आणि ५ षटकारांसह १३० धावा केल्या. गोलंदाजीत मोहम्मद शमीने ५ बळी मिळवले. कुलदीपने २ तर बुमराह-सिराजने १-१ बळी टिपला.




🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies