Type Here to Get Search Results !

धक्कादायक: चौघांनी मिळून एकाला कोयत्याने मारहाण: आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल



सातारा: तंबाखू दिली नाही म्हणून एकास लाथाबुक्यांनी मारहाण करुन कोयत्याने डोक्यात वार केला. हा प्रकार सातारा शहराजवळील प्रतापसिंहनगरात घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी रोहित जितेंद्र भोसले (रा. प्रतापसिंहनगर) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार मनोज पवार, संतोष लंकेश्वर, दत्ता भोसले आणि सौरभ मंडलिक सर्व (रा. प्रतापसिंहनगर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. 


तक्रादार यांनी तंबाखू दिली नाही म्हणून त्यांना चिडून संशयितांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच एकाने कोयत्याने डोक्यात वार केला. त्याचबरोबर भांडणे सोडविण्यास आल्यानंतर तक्रारदाराच्या आईलाही धक्काबुकी करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies