Type Here to Get Search Results !

आटपाडी : श्री उत्तरेश्वर देवाची यात्रा ; शेळ्या-मेंढ्याची होणार निवड ; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसे व ट्रॉफी : सभापती पै. संतोष पुजारी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी शहराचे ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवाची शेळ्या-मेंढ्याची यात्रा उद्या दिनांक २६ पासून सुरु होत असून यावेळी प्रथमच यात्रेमध्ये येणाऱ्या शेळ्यांची व बकऱ्यांची समिती मार्फत निवड करण्यात येणार असून रोख स्वरुपात बक्षीस देखील देण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती पै. संतोष पुजारी यांनी दिली.


यामध्ये २ दाटी बकरा प्रथम क्रमांक 11 हजार रुपये, ४ दाती बकरा 11 हजार रुपये, ६ दाती बकरा 11 हजार रुपये, जुळूक बकरा 11 हजार रुपये तसेच वरील सर्व गटातून एक चम्पियन बकरा निवडला जाणार असून  यासाठी देखील 11 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.


मेंढी कळप १० नग प्रथम क्रमांकसाठी 11 हजार रुपये बक्षीस असून द्वितीय क्रमांकासाठी सात हजार व तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.  तसेच मेंढी कळप १५ नग प्रथम क्रमांकसाठी 11 हजार रुपये बक्षीस असून द्वितीय क्रमांकासाठी सात हजार व तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.  


सदर स्पर्धेसाठी नाव नोंदणी ही दिनांक २६ रोजी १.०० वाजेपर्यंत घेतली जाणार आहे. विजेत्यांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व बक्षीस रक्कम उद्या २६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या निवडीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी भाग घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती पै. संतोष पुजारी व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी केले आहे. 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies