सध्या असाच एक तरुणीचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तरुणीचा डान्स पाहून लोकांना दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची आठवण येत आहे. लोकांना तरुणीचा डान्स खूप आवडला आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे साई पल्लवी. अभिनयाबरोबरच ती नो-मेकअप लूक आणि भन्नाट डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. तेलुगू, तमिळ, मल्याळम या तीन सिनेसृष्टीत तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
‘राऊडी बेबी’ हे गाणे साई पल्लवी आणि अभिनेता धनुष यांच्या ‘मारी २’ या चित्रपटातील आहे. या गाण्यावर धनुष आणि साई पल्लवीने भन्नाट डान्स केला होता.
दोघांच्या डान्समुळे हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर खूप चर्चेत आले होते. विेशेष म्हणजे या गाण्यातील अभिनेत्री साई पल्लवीचा डान्स पाहून लोक तिचे चाहते झाले होते. आता याच गाण्यावर एका तरुणीने केलेला डान्स पाहून लोकांना साई पल्लवीची आठवण येत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.