Type Here to Get Search Results !

इन्स्टाग्रामवर तरुणासोबत ओळख करणे तरुणीला पडले चांगलेच महागात...



सातारा : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या १७ वर्षीय तरुणीवर एका तरुणाने विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.


विशाल बाळकृष्ण अवघडे (वय ३५, रा. कुमठे, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी १७ वर्षांची असून, विशाल आणि तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीतून विशालने पीडितेला त्याच्या दुचाकीवर बसवून साताऱ्यातील विविध ठिकाणी फिरवले. तसेच पाटखळ येथील एका लाॅजवर गोड बोलून नेऊन तिच्यावर त्याने बलात्कार केला. 


मात्र, घाबरलेल्या पीडित तरुणीने या घटनेची कोठेही वाच्यता केली नाही. ती घरात शांत राहत असल्याने आईने तिची विचारपूस केली असता घडलेला प्रकार तिने आईला सांगितला. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात पीडित तरुणीने तक्रार दाखल केली. 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies