Type Here to Get Search Results !

IND vs SL, World Cup 2023: टीम इंडिया उपांत्य फेरीत; लंकेचा मोठ्या धावांनी पराभव



ICC Cricket World Cup 2023: भारत आणि श्रीलंका यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने ३०२ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. ३५८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १३.२ षटकात अवघ्या ५५ धावांवर गडगडला. या विजयासह टीम इंडियाने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.


भारताची सुरुवात खराब

भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्माला दिलशान मदुशंकाने क्लीन बोल्ड केले. त्याला चार धावा करता आल्या. यानंतर विराट कोहलीने शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची भागीदारी केली. मधुशंकाने ही भागीदारी तोडली. त्याने ९२ धावांवर शुबमनला यष्टिरक्षक कुसल मेंडिसकडे झेलबाद केले. शुबमन ९२ चेंडूत ९२ धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले. यानंतर विराटचे शतकही हुकले. मधुशंकाने त्याला निसांकाकडून झेलबाद केले.

विराटने ९४ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ८८ धावांची खेळी केली. यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने ४६ चेंडूत ६० धावांची शानदार भागीदारी केली. राहुल १९ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. त्याला दुष्मंथा चमीराने बाद केले. सूर्यकुमार यादव काही विशेष करू शकला नाही. तो नऊ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. दरम्यान, श्रेयसने एकदिवसीय कारकिर्दीतील १६ वे अर्धशतक झळकावले. मधुशंकाने श्रेयसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तो ५६ चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ८२ धावा करून बाद झाला. मोहम्मद शमी दोन धावा करून बाद झाला. त्याचवेळी रवींद्र जडेजाने २४ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३५ धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून मधुशंकाने पाच, तर चमीराला एक विकेट मिळाली.


लंकेची सुरुवात खराब 

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ केवळ ५५ धावा करू शकला. कसून राजिताने सर्वाधिक १४ धावा केल्या. त्यांच्याशिवाय महिष तिक्षिना आणि अँजेलो मॅथ्यूजने प्रत्येकी १२ धावा केल्या. श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्य धावांवर बाद झाले. त्याचवेळी आठ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट घेतल्या. तो या सामन्याचा सामनावीर ठरला. मोहम्मद सिराजने तीन तर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies