Type Here to Get Search Results !

सांगली महानगरपालिकेचा प्रभारी मुकादम लाचलुचपतच्या जाळ्यात ; मानधन काढण्यासाठी मागितली होती लाच



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : तक्रारदार यांचे ४ महिन्याचे हजेरी लावून मानधन काढलेच्या मोबदल्यात १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, ८००० रुपये लाच स्विकारताना सांगली महानगरपालिकेच्या प्रभारी मुकादमास लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. किशोर जगन्नाथ जबडे, वय ४८ वर्ष, व्यवसाय प्रभारी मुकादम, वार्ड क्रं. २० आरोग्य विभाग, वैरण बाजार मिरज असे लोकसेवकाचे नाव आहे. 


तक्रारदार यांचे ४ महिन्याचे हजेरी लावून मानधन काढलेच्या मोबदल्यात लोकसेवक श्री. किशोर जगन्नाथ जबडे, प्रभारी मुकादम, वार्ड क्रं.२० आरोग्य विभाग, वेरण बाजार मिरज, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांनी तक्रारदार यांचेकडे प्रत्येक महिन्याचे ३,०००/- प्रमाणे ४ महिन्याचे एकुण १२,०००/- रूपये लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि.२०.११.२०२३ रोजो अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.


तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक २०.११.२०२३ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये लोकसेवक श्री. किशोर जगन्नाथ जबडे, प्रभारी मुकादम, वार्ड क्रं.२० आरोग्य विभाग, वैरण बाजार मिरज यांनी तक्रारदार यांचे ४ महिन्याचे हजेरी लावून मानधन काढलेच्या मोबदल्यात प्रत्येक महिन्याचे ३,०००/- प्रमाणे ४ महिन्याचे एकुण १२,०००/- रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.


त्यानंतर आज दि. २१.११.२०२३ रोजी मिरज शहर पोलीस स्टेशनचे बाजुस सुभाष टी स्टॉल जवळ सापळा लावला असता लोकसेवक श्री. किशोर जगन्नाथ जबडे, प्रभारी मुकादम यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून ८,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.


त्या अनुषंगाने लोकसेवक श्री. किशोर जगन्नाथ जबडे, प्रभारी मुकादम, वार्ड नं.२० आरोग्य विभाग, वैरण बाजार मिरज, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका रा. मदीना मश्जिद वॉलनेस टाकीजवळ, सुभाषनगर, क गट ता. मिरज, जि. सांगली यांचेविरुध्द मिरज शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.


सदरची कारवाई मा. श्री. अमोल तांबे सोो पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, श्री. विजय चौधरी सोा, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संदीप पाटील, पोलीस उप अधीक्षक, श्री. विनायक भिलारे, पोलीस निरीक्षक, श्री. दत्तात्रय पुजारी पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार प्रितम चौगुले, रामहरी वाघमोडे, ऋषीकेश बडणीकर, अजित पाटील, पोपट पाटील, धनंजय खाडे, सलिम मकानदार सुदर्शन पाटील सिमा माने, अतुल मोरे, चालक बंटमुरे यांनी केली आहे.


नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर व मोबाईल नंबर ९८२१८८०७३७ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies