Type Here to Get Search Results !

कवठेमहांकाळ : अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने युवकाचा खून


माणदेश एक्सप्रेस न्युज/कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील लंगरपेठ येथील संभाजी जगन्नाथ शिंदे (वय 32) या युवकाचा अज्ञात कारणावरून खून करण्यात आल्याची घटना बुधवार राञी 10 च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अज्ञात तीन जणावर खुनाचा गुन्हा कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


अधिक माहिती अशी, संभाजी शिंदे याचे लंगरपेठ येथे किरणा दुकान आहे. सदरचे दुकान बंद करून तो घरी शिंदे मळा येथे बुधवार रात्री 9 ते 10 च्या सुमारास जात असताना अज्ञात तीन इसमानी लंगरपेठ ते शिंदे वस्ती रस्त्यावर धारदार हत्याराने शिंदे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. 


या खुनाचे कारण अजून स्पष्ट झाले नसून अज्ञात तीन इसमावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील हे करीत आहेत.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies