Type Here to Get Search Results !

निंबवडे क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न



माणदेश एक्सप्रेस न्युज : निंबवडे/वार्ताहर : मल्हार प्रतिष्ठान आयोजित निंबवडे प्रीमियर लीग पर्व 7 चे उद्घाटन वसंतदादा पाटील कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. 


या पर्वात अहिल्या 11 मुढेवाडी,  क्रांती स्पोर्ट्स निंबवडे,  भूतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी (विक्रम), साहिल ज्वेलर्स कोकरेनगर, अभयदादा 11 वरकुटे,  रेंजर वारिअर्स कुरणेवाडी, भूतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी (संतोष), पावरप्लस कटरेवाडी, तिरंगा स्पोर्ट्स घाणंद, स्वराज सुपर किंग निंबवडे, कै.पै राजाराम वाक्षे युवा मंच,  साथी ग्रुप निंबवडे, सिद्धनाथ क्रिकेट क्लब गारुडी, जय बजरंग बेरगळवाडी, जय अहिल्या युवा मंच अनुसेवाडी अशा पंधरा टीम सहभागी आहेत.


उद्घाटन प्रसंगी आटपाडी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, राष्ट्रवादीचे माण तालुका नेते अभय जगताप, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव नारायण खरजे, काँगेसचे तालुकाध्यक्ष जयदीप भोसले, आटपाडी मार्केट कमिटी उपसभापती राहुल गायकवाड, कैलास देवडकर, संचालक सुनील तळे निंबवडे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब मोटे, डॉ.बी.टी.पिंजारी, ग्रामपंचायत सदस्य सचिन मोटे, सदस्य साऊबा अनुसे, युवा नेते समाधान पिंजारी, ज्ञानेश्वर होळे, विकास वाक्षे व  मान्यवर उपस्थित होते.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies