Type Here to Get Search Results !

घरफोड्या करणाऱ्याला अटक करुन ६ लाख, ७३ हजाराचे दागिने हस्तगत



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला अटक करुन त्याच्याकडून ६ लाख ७३ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आले असून, संशयिताने दहा ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.


सांगली जिल्हा पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व कर्मचारी यांचे एक पथक तयार करुन कोम्बींग ऑपरेशन राबवुन घरफोडीचे गुन्हे करणारे संशयीत इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.


पथकामधील राजु शिरोळकर यांना यल्लाप्पा ऊर्फ खल्या आदरक शिंदे (वय ४२ रा. दत्तनगर, मोहोळ, जि. सोलापुर) हा चोरी केलेले सोन्याचांदीचे दागिने विक्री करीता मिरज येथील सिव्हील हॉस्पिटल चौकात बसवेश्वर उदयानासमोर येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली. 


उद्यान परिसरात सापळा लावून थांबले असता, एक इसम हिरव्या रंगाची पिशवी हातात घेवून श्री. बसवेश्वर उद्यानासमोर येवून थांबला तसा त्याचा संशय आलेने पथकाने सदर ताब्यात घेवून चौकशी करीत झडती घेतली. त्याच्या हातातील पिशवीत १० तोळे सोन्याचे दागिने व एक किलो चांदीचे दागिने मिळून आले.


मिरज तालुक्यातील सुभाषनगर, मालगाव आणि एरंडोली गावात, कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड आणि जत तालुक्यात डफळापुर, कंठी, वायफळ, आणि बनाळी गावात रात्री आणि दिवसा घर फोडी करून चोरी केली असल्याची कबूली त्यांने दिली. 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies