Type Here to Get Search Results !

धक्कादायक : नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून खून ; न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा; कारण...



उत्तर प्रदेशातील संभलच्या जिल्हा न्यायालयाने पतीचा खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच या महिलेला २५ हजार रुपयांचा दंड देखील आकारण्यात आला आहे. 


खरं तर संबंधित महिला गोरी होती तर तिचा नवरा काळा सावळा होता. यामुळे ती आपल्या पतीचा तिरस्कार करत होती. याच कारणावरून तिने १५ एप्रिल २०१९ रोजी पती झोपेत असताना त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. याप्रकरणी मृत पतीच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.


दरम्यान, पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यानंतर आरोपी महिलेला शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून आणि पुरावे पाहिल्यानंतर न्यायालयाने आरोपी महिलेला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 


गावातील रहिवासी हरवीर सिंगने पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रारदाराची वहिनी प्रेमश्री हिने तिचा पती सत्यवीरला जाळून त्याची हत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी प्रेमश्रीला अटक केली.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies