Type Here to Get Search Results !

राज्यात आज कुठे होणार गारपीट? घ्या जाणून



पुणे : राज्यात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, नगरमधील पारनेर आणि नाशिक जिल्ह्यातील चांदवड, निफाड, येवला, सिन्नर या तालुक्यांना रविवारी गारपिटीचा फटका बसला. गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिके, भाजीपाल्यांसह द्राक्ष, डाळिंब, पपई, केळीच्या बागांना मोठा फटका बसला आहे. आज, सोमवारी पश्चिम विदर्भात गारपीट होण्याचा, तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. राज्यातील तीन जिल्ह्यांत आज अतिमुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे .


नाशिक जिल्ह्यातील चांदवड, निफाड, येवला, सिन्नर या चार तालुक्यांना आणि पुण्यातील आंबेगाव आणि नगरमधील पारनेर तालुक्याला गारपिटीचा फटका बसला आहे. गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्ष, डाळिंब, पपई, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबेगावमध्ये गारांचा खच पडला होता. नाशिकमध्ये गारपिटीसह संततधार सुरू होती. संततधार पावसामुळे द्राक्षबागांमध्ये फळकुज आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. डाळिंबावर तेल्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. पपई आणि केळीला गारांचा मार लागून पिके खराब झाली आहेत.


सातारा आणि परिसरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. सातारा शहरासह वाई, जावली, महाबळेश्वर, पाचगणी व उत्तर साताऱ्याच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाने सातारा शहरात सर्वत्र पाणी साठले होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. सध्या भाताची काढणी सुरू असून, काढून ठेवलेला भात भिजल्यामुळे काळा पडण्याचा धोका आहे. वाई आणि महाबळेश्वर परिसरातील स्ट्रॉबेरी पिकांचेही नुकसान झाले आहे. रविवारी कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.


ऑरेंज अलर्ट – अकोला, बुलडाणा, वाशिम (पाऊस, गारपीट)   

यलो अलर्ट – पालघर, ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ (हलका ते मध्यम पाऊस)

 

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies