Type Here to Get Search Results !

फौजी जवानानं अचानक बायकोला दिलं सरप्राईज, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल...



आपल्या मुलाला सैन्यात पाठवणारे ते आई-वडील केवढ्या मोठ्या मनाचे असतील! देशासाठी आपल्या पोटचा गोळा देणं म्हणजे केवळ शौर्य असतं त्या मातेच्या भाळी? एका मातेसाठी आपला मुलगा व पत्नीसाठी आपला नवरा देशासाठी लढतो याचा अभिमान असतोच.


जवानांचं सीमेवरच जगणं पाहिलं तर, हृदय हेलावून जाणारं असतं. मात्र हाच आईच्या काळजाचा तुकडा, पत्नीचा आधार पुन्हा आपल्या मायभूमी येतो तेव्हा होणारा आनंद हा त्या कुटुंबालाच ठाऊक असतो. अशाच एका जवानानं घरी येत आपल्या पत्नीला सरप्राईज दिलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहू तुमच्याही डोळ्यात पाणी येईल


भारतमातेचा तिरंगा समोर दिसला की त्याचा अभिमान जागा होतो. फौजी तिरंग्यासाठी जगतो आणि तिरंग्यासाठी बलिदान देतो. तिरंग्याचे तीन रंग फौजीचे आयुष्य रंगीबेरंगी बनवतात. मात्र या सगळ्यात त्यांची नाळ कुटुंबाशीही जोडलेली असते.


अशाच एका जवानानं आपल्या बायकोला सरप्राईज दिलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रुममध्ये एक बेड ठेवला आहे. तो त्या रुममधून शिफ्ट करायचा आहे. यावेळी याठिकाणी असलेल्या तीन महिला हा बेड सरकवताना दिसत आहे.


याचवेळी जवान गुपचूप येतो आणि त्या बेडवर झोपतो. या महिलेला याची जराही कल्पना नसते. यावेळी जेव्हा ती बेड पूर्णपणे खाली ठेवते तेव्हा तीला तिचा नवरा दिसतो आणि ती आश्चर्यचकित होते. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये.


एवढ्या दिवसांनी घरी आलेल्या जवानाला पाहून ती तिचे अश्रू थांबवू शकली नाही, तिने लगेच त्याला मिठी मारली. हा भावनीक क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies