Type Here to Get Search Results !

धक्कादायक : पत्नी आणि मुलांची हत्या करुन स्वतःनेही संपवली जीवनयात्रा; वाचा काय आहे...

 


डॉक्टर अरुण कुमार नावाच्या एका डॉक्टरने आपल्या पत्नी आणि मुलांची हत्या केली त्यानंतर स्वतः आत्महत्या करुन आयुष्य संपवलं. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. डॉ. अरुण कुमार यांनी नैराश्यातूनही हे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


रायबरेली येथील रेल्वे वसाहतीत ते कुटुंबासह राहात होते. त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब होतं. मागच्या रविवारी ते दिसले त्यानंतर दिसलेच नाहीत. त्यामुळे डॉक्टरांचे सहकारी त्यांची विचारपूस करायला त्यांच्या घरी गेले. सहकाऱ्यांनी दार वाजवलं पण काहीही प्रतिसाद आला नाही. 


त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला. घरात गेल्यानंतर पाहिलं तर डॉक्टर अरुण कुमार, त्यांची पत्नी आणि दोन मुलं यांचे मृतदेह होते. डॉक्टर अरुण यांच्या पत्नीचं नाव अर्चना होतं. तर मुलीचं नाव अदिवा होतं आणि मुलाचं नाव आरव होतं. पोलिसांना याविषयीची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले.


डॉ. अरुण कुमार यांच्या घरात पोलिसांना एक हातोडी, रक्ताचे डाग, औषधांची इंजेक्शन्स सापडली. डॉक्टरांनी आधी आपल्या पत्नीला आणि मुलांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर हातोडीने त्यांचं डोकं फोडलं आणि त्यांना ठार केलं. त्यानंतर डॉक्टरांनी मनगटाची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. ज्यानंतर गळफास घेऊन डॉक्टर अरुण कुमार यांनी आत्महत्या केली. 

या सगळ्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. यातून आम्हाला आणखी माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे असं रायबरेलीचे पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शनी यांनी म्हटलं आहे. डॉ. अरुण कुमार यांचे शेजारी कमाल कुमार दास म्हणाले ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies