Type Here to Get Search Results !

म्हसवड-दहिवडी रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार



माणदेश एक्सप्रेस न्युज : म्हसवड/प्रतिनिधी : माण तालुक्यातील म्हसवड-दहिवडी रस्त्यावर दिवड फाट्याजवळ चारचाकी व दुचाकी अपघातातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सदरची घटना ही आज दिनांक १६ रोजी दुपारी १.३० च्या दरम्यान घडली.


याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, आज दिनांक 16 रोजी दुपारी 1:30 वा. चे सुमारास मौजे दिवड ता. माण जि. सातारा गावचे हद्दीत सातारा ते पंढरपुर रोडवर बाळु शंकर साळुंखे (वय 57) रा. पाटोळे-खडकी ता. माण जि. सातारा हे दुचाकीवरून पळशी बाजुकडुन म्हसवड कडे येत होते.


तर म्हसवड कडून चारचाकी (MH45AQ4056)  गाडी चालक राजरतन सुदाम नागरगोजे याने दुचाकीस्वारास (MH14LC3812)  समोरुन धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार बाळु शंकर साळुंखे हा जागीच ठार झाला. या अपघाताबाबत किसन लक्ष्मण माने यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात आरोपी राजरतन सुदाम नागरगोजे याचे विरुद्ध फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies