Type Here to Get Search Results !

प्रकाश जावडेकरांचा पराभव करत जाएंट किलर ठरलेल्या “या” माजी आमदारांचे निधन



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : जनता दल निधर्मी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा मिरज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचं निधन झालं आहे. प्राशरद पाटील यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. तर, पुणे पदवीधर मतदारसंघातून प्रकाश जावडेकर यांचा पराभव करत विजयी झाले होते. 


प्रा. शरद पाटील हे जनता दलाच्या तिकिटावर महाराष्ट्राच्या विधानसभेत मिरज विधानसभा मतदारसंघातून १९९० आणि १९९५ मध्ये विजयी झाले होते. यानंतर विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून शरद पाटील यांनी निवडणूक लढवली. २००२ मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पाटील यांनी भाजपचे दिग्गज नेते प्रकाश जावडेकर यांना पराभूत केलं होतं. प्रकाश जावडेकर यांना पराभूत करत ते जाएंट किलर ठरले होते.


देशाचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या जनता दल निधर्मी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शरद पाटील यांनी काम पाहिलं. ५५ वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्यानं शरद पाटील सामाजिक चळवळींना बळ देण्याचं देखील काम करत होते. यशवंत शिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणून देखील ते कार्यरत होते. शरद पाटील गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.


शरद पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयातून त्यांना काल घरी आणण्यात आलं होतं. आज पहाटेच्या वेळी त्यांना ह्रदयविकाराचा धक्का बसला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं. शरद पाटील यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज दुपारी शरद पाटील यांच्यावर सांगलीतील कुपवाड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies