Type Here to Get Search Results !

सांगलीचे माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन



सांगली : सांगलीचे माजी महापौर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक कांबळे (वय ६५) यांचे पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना आज दिनांक १५ रोजी सकाळी निधन झाले. मिरज नगरपरिषेदपासून महापालिकेपर्यंत त्यांनी आपल्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत असताना महापौर पदही भूषविले होते. त्याच बरोबर मिरजेसह जिल्ह्यात दलित चळवळीत सक्रिय सहभागी होऊन त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला होता.


दि. १५ नोव्हेंबर रोजी मार्निंग वॉक करीत असताना त्यांना एका वाहनाने ठोकरले होते. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचे निधन झाले. सायंकाळी मिरज कृष्णाघाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चाात मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies