Type Here to Get Search Results !

हृदयस्पर्शी: परदेशी निघालेल्या आईचा निरोप घेताना जुळी लेकरं झाली भावनिक; व्हिडीओ पाहून तुम्हीही रडू येईल...

 


सध्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जी आपल्या मुलांपासून दूर परदेशी जात आहे. एअरपोर्टवरील हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यातही अश्रू येतील. परदेशात कामासाठी निघालेल्या एका महिलेने आपल्या मुलांचा निरोप घेतानाचा एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


रिधिन देवासी कुट्टी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या क्लिपमध्ये त्यांची पत्नी नीना रिधिन आणि त्यांची जुळी मुले रायन आणि रायन यांचा समावेश होता. केरळमधील हा व्हिडीओ असल्याचे समजते.


व्हायरल क्लिपमध्ये नीना यांचा विमानतळावर निरोप घेण्यासाठी कुटुंबीय आले होते. तिच्या लहान जुळ्या मुले तिच्या सामानाची ट्रॉली ढकलताना दिसत आहे. त्यांना पाहून नीनाही भारावून जातेय.


हृदयद्रावक क्लिपमध्ये दिसते आहे की नीना काचेच्या दारातून तिच्या मुलांना निरोप घेत आहे. त्यावेळी मुलांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते त्यांच्या वडिलांकडे जाऊ आईकडे जाण्याची विनंती करताना दिसत आहे.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies