Type Here to Get Search Results !

आटपाडीच्या देशमुख महाविद्यालयास नॅक पिअर टीमची भेट : महाविद्यालयास नॅकचे ‘हे’ मुल्यांकन प्राप्त



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयामध्ये १४ व १५ डिसेंबर रोजी नॅक पिअर टीमने मूल्यांकनासाठी भेट दिली. यामध्ये महाविद्यालयास B++ असे मानांकन व २.९४ ( CGPA) प्राप्त झाला आहे. यानंतर महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी - विद्यार्थिंनीमध्ये जल्लोषाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयामध्ये अभिनंदनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  डॉ. विजय लोंढे यांनी सर्वांचे स्वागत केले व नॅक समन्वयक डॉ. शिवाजीराव विभुते यांनी नॅक पिअर टीम भेटीसंबंधीची संपूर्ण प्रक्रियेची माहिती उपस्थितांना दिली.


यावेळी संस्थेचे चेअरमन अमरसिंह देशमुख यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. शिवाजीराव भोसले, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. विजय लोंढे, नॅकचे समन्वयक डॉ. शिवाजीराव विभुते सर्व क्रायटेरियांचे चेअरमन, सर्व सदस्य, एनसीसी, एनएसएस, क्रीडा, सांस्कृतिक विभाग, प्रशासकीय सेवक, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व स्टाफचे अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले.


यावेळी बोलताना अमरसिंह देशमुख म्हणाले, महाविद्यालयातील सर्व स्टाफवर माझा विश्वास असून एकजुटीने ते काम करत आहेत. या अगोदरही २००५ व २०१५ साली महाविद्यालय सक्षमपणे नॅकला सामोरे गेले होते. टप्प्याटप्प्याने महाविद्यालयाची गुणवत्ता वाढत असून येणाऱ्या काळात महाविद्यालयाच्या विकासाकरिता व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी संस्थेचे पूर्णतः सहकार्य असेल. नव्या शैक्षणिक धोरणांना सामोरे जाताना,नवी आव्हाने स्वीकारुन विद्यार्थी हा केंद्रवर्ती घटक नजरेसमोर ठेवून नवनवीन कोर्सेस महाविद्यालयामध्ये सुरू करण्यासंबंधीची सकारात्मक भूमिका त्यांनी व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी ही मनोगत व्यक्त केले.


संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष कारंडे, सचिव हणमंत पवार, निरीक्षक अशोक चौगुले, प्रकाश नामदास, अरुण गायकवाड यांनीही महाविद्यालयाच्या या यशाबद्दल अभिनंदन व्यक्त केले. ज्युनियर विभागाचे प्रमुख प्रा. संताजी लोखंडे यांनी आभार व्यक्त केले. डॉ.  विजय लोंढे यांनी सूत्रसंचालन केले.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies