Type Here to Get Search Results !

मायलेकीचा दोरीने गळा आवळून खून करणाऱ्या आरोपीस ७२ तासाच्या आत अटक : सोन्याच्या दागिन्याकरिता आरोपींनी केले होते खून



माणदेश एक्सप्रेस न्युज : म्हसवड/प्रतिनिधी :  पर्यंती ता. माण येथील मायलेकीचा दोरीने गळा आवळून खून झाल्याच्या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरुन गेला होता या घटनेतील खून्यांच्या ७२ तासात मुसक्या आवळण्याचे काम सातारा पोलीसांनी केले आहे.


याबाबत अधिक माहीती अशी, २० डिसेंबर २०२३ रोजी पर्यंती ता. माण जि.सातारा गावचे हद्दीत राहत असलेल्या  श्रीमती नंदाबाई भिकु आटपाडकर वय ५८ वर्षे  व श्रीमती संपताबाई लक्ष्मण नरळे वय ७५ वर्षे यांचा अज्ञात इसमांनी त्यांचे अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने मोबाईल, व रोख रक्कम चोरून नेत दोघींचा गळा आवळुन खुन केला होता.


सदरची घटना ही अतिशय गंभीर असल्याने  समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा तसेच श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या. 


दि. २४/१२/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांचे विश्वसणीय गोपनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, परराज्यातील असणारा रहिवासी व सध्या पर्यंती ता. माण जि.सातारा गावात राहणारा जे.सी.बी. चालक  संदीप शेषमणी पटेल वय वर्ष 30 वर्ष रा. परसिधी करोल खुर्द सिधी सिहवालं मध्य प्रदेश व त्याचा साथीदार  अजित कुमार रामकिशोर पटेल वय -29 रा.परसिधी करोल खुर्द सिधी सिहवालं मध्य प्रदेश असे दोघांनी मिळून सोन्याचे दागिणे व पैशासाठी नमुद दोन महिलांचा खुन केला आहे. 


सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तपास पथकांना सदर इसमांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या.  तपास पथकांनी पर्यंती ता. माण गावचे परिसरात व आजुबाजुचे परिसरात प्राप्त माहितीतील इसमांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे नमुद गुन्ह्याचे अनुशंगाने सखोल व कौशल्यपूर्ण विचारपुस केली असता त्यांनी सदचा गुन्हा सोन्याचे दागिणे व पैसे मिळवण्याकरीता केला असल्याचे सांगीतल्याने सदरचा दुहेरी खुनाचा गुन्हा ७२ तासाच्या आत उघडकीस आणण्यास यश प्राप्त झाले आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies