Type Here to Get Search Results !

आटपाडीतील भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर बचत भवनची दुरावस्था : सरकारी स्तरावर अनास्था ; अन्यथा आंदोलन करणार : विलास खरात



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर बचत भवन इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचे, जिल्हा परिषद सांगली, मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली अंदाज पत्रक सादर केले आहे. त्या अंदाजपत्रकात इमारतीचा खर्च रकम 15,99,999 प्रस्ताव सादर केला आहे. परंतु सदर प्रस्तावास मान्यता मिळाली नसल्याचे जेष्ठ नेते विलास खरात यांनी नमूद केला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन इमारतीची देखभाल दुरुस्ती, साफसफाई व सदर इमारतीचा सामाजिक कार्यासाठी वापर होणे बाबतचे निवेदन दि.०९/०६/२०२३ रोजी समस्त आंबेडकरी समुहा मार्फत गटविकास अधिकारी आटपाडी व मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली व सबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केलेले होते.


त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी दिनांक ०४/०७/२०२३ रोजी कार्यकारी अभियंता (इ.व.द) जिल्हा परिषद सांगली व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सो, जि.प.सांगली यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचे अंदाजपत्रक सादर केलेले आहे. त्या अंदाजपत्रकात इमारतीचा खर्च रक्कम रुपये १५,९९,९९९ /- च्या दुरुस्ती खर्चाचा प्रस्ताव सादर केलेला आहे. परंतु अद्याप ही सदर प्रस्तावास मान्यता मिळालेली नाही.


आटपाडी येथील शासकीय जागेत बचत शेतकरी निवास इमारतीचे भूमिपूजन समारंभ दि.२०/१२/१९८२ रोजी करणेत येवून सदर वास्तूचे उदघाटन समारंभ दि.२४/०२/१९८६ रोजी  करणेत आलेला आहे. त्यानंतर साधारण सन १९९१-९२ च्या दरम्यान आटपाडी येथील पंचायत समितीच्या आम सभेमध्ये आम्ही संघर्ष करून सदर बचत  भवन इमारतीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणेस सर्वांच्या संमतीने मान्यता घेण्यात आलेली होती. त्यामुळे सदर वास्तुस “ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन आटपाडी” असे नामकरण करणेत आलेले होते. त्यानंतर सदर इमारतीत अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असत. सदर ठिकाणी सभा, बैठका, आम सभा, जनता दरबार, सांस्कृतिक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम आणि गोर-गरिबांची लग्ने अल्प दरात सदर वास्तूत होत होती.


सध्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन ही पवित्र वास्तू सध्या अडगळीत पडलेली आहे. सदर वास्तूची दुरवस्था झालेली आहे. दरवाज्या- खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. घाणीचे साम्राज्य झालेले आहे. लाईटची सोय नाही. पावसाळ्यात इमारतीची गळती होते. रंग-रंगोटी नाही, कसलीही दुरुस्ती नाही या वास्तूची दुर्दशा झालेली आहे.


त्यामुळे “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन आटपाडी” या पवित्र वास्तूची सत्वर देखभाल दुरुस्ती, साफसफाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टायटल मध्ये टाकणे व सदर वास्तूचा सामजिक कार्यासाठी वापर होणे बाबत कार्यवाही झाली नाही तर, आंबेडकरी समूह व तालुक्यातील जनतेच्या वतीने जन आंदोलन करण्याचा इशारा  जेष्ठ नेते विलास खरात, आप्पा खरात, यशवंत मोटे,  मोहन खरात, नंदकुमार खरात, बाबुराव मोटे, कुमार मोटे, चंद्रकांत मोटे, अंकुश मुढे यांनी दिला. 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies