Type Here to Get Search Results !

धक्कादायक : व्यावसायिकाने पत्नी आणि मुलाची गळा दाबून केली हत्या




मुंबई : कल्याणमध्ये एका व्यावसायिकाने त्याच्या सात वर्षीय मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीपक गायकवाड असे या क्रूर पतीचे नाव आहे. त्याची कल्याण शहरात नानू वर्ल्ड ही खेळण्याची दुकाने आहे. स्वत: दीपकने देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 


दिपक गायकवाड हा त्याची पत्नी अश्वीनी आणि सात वर्षाचा मुलगा आदिराज याच्यासोबत राहतो. आज दुपारी त्याने त्याच्या भावाला फोन करुन माहिती दिली की, त्याने पत्नी आणि मुलाची हत्या केली आहे.  तसेच स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याची माहिती महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली.


महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मुलगा आणि त्याच्या आईचा मृतदेह ताब्यात शवविच्छेदनाकरीता रुग्णालयात पाठविले. 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies