Type Here to Get Search Results !

धक्कादायक: पिडीत महिलेला धमकावून बलात्कार; लष्करी जवानाविरुद्ध गुन्हा

 


पुणे : महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 


बळीराम माधवराव सुट्टे (वय ३५, मूळ रा. बीड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी बळीराम भोपाळ येथील इंजिनीयर रेजिमेंटमध्ये नियुक्तीस आहे. पीडित महिला त्याच्या ओळखीतील आहे. बळीराम महिलेच्या घरी गेला होता. 


त्यावेळी त्याने महिलेचे नकळत मोबाइलवर चित्रीकरण केले. ते प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने महिलेवर बलात्कार केला. बळीराम याच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने अखेर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies