Type Here to Get Search Results !

धक्कादायक : कार्तिकी वारीसाठी निघालेल्या तरुण वारकऱ्यांचा मृत्यू; तर तिघे जण जखमी



पुणे :  कार्तिकी वारीसाठी  पंढरपूर हून आळंदी कडे श्री पांडुरंग व संत नामदेव महाराज पालखी सोहळा जेजुरी जवळील दौंडज खिंडीतून मार्गस्थ होताना पहाटे साडे चार वाजता या वारीतील चार वारकऱ्यांना पीकअप जीपने  धडक दिली. या अपघातात एका तरुण वारकऱ्याचा मृत्यू झाला. तर तिघे वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.


याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर हून आळंदी कडे वारकरी दिंडी जात होती. पहाटे साडे चार वाजता दौंडज खिंडीत काही वारकरी टँकरच्या नळावर हात पाय धुत असताना मागून आलेल्या पीकअप जीप ने चार वारकऱ्यांना धडक दिली.


या अपघातात कृष्णा नागोराव गरुड ( वय २३)  रा. मटकर आळा ता. जिल्हा परभणी यांचा जागीच मृत्यू झाला तर सिधेशोर प्रभाकर बोबडे ( वय 23.) रा. बोबडे टाकली ता. जि. परभणी, रितेश राजाराम ब्रम्हे ( वय 18 ) रा. बोबडे टाकली ता. जि. परभणी , चक्रधर कोपलवर ( वय 28 ) रा. साडेगाव ता. जि. परभणी हे तिघे जखमी झाले आहेत. 


या जखमी रुग्णांना उपचारासाठी ससून रुग्णालय पुणे येथे दाखल केले आहे.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies