Type Here to Get Search Results !

ट्रकच्या चाकाखाली चिरडून १९ वर्षीय तरूणीचा मृत्यू



सातारा: सातारा-कोरेगाव रस्त्यावर संगम माहुलीजवळ ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून एका १९ वर्षीय तरूणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. दिशा उदय घोरपडे (वय १९, मूळ रा. शिरढोण, ता. कोरेगाव, सध्या रा. सदर बझार सातारा) असे अपघातात ठार झालेल्या तरूणीचे नाव आहे.


 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिशा घोरपडे ही शनिवारी सोनगाव, ता. सातारा येथे मामाकडे गेली होती. रविवारी सकाळी ती दुचाकीवरून साताऱ्याकडे यायला निघाली. संगम माहुलीजवळ आल्यानंतर ट्रकला ओव्हरटेक करून ती पुढे गेली. मात्र, तिची दुचाकी अचानक घसरल्याने ती ट्रकखाली सापडली.


या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार कारळे व हवालदार धनाजी यादव हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. या अपघामुळे वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी त्यांनी पूर्ववत केली. मृत तरूणीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies