Type Here to Get Search Results !

इमारतीला भीषण आग लागल्याने दोघांचा होरपळून मृत्यू



मुंबई : मुंबई मध्ये प्रसिद्ध गिरगाव चौपाटी येथील चार मजली इमारतीला शनिवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने या आगीच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. 


मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीमध्ये अग्निशमन दलाने तीन लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे, तर इमारतीत काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. गोमती भवन इमारतीला लेव्हल २ ची आग लागली होती. अग्निशमन दलाच्या १० गाड्या पोहोचल्या होत्या. ही आग तिसरी आणि चौथ्या मजल्यावर पसरली होती. 


इमारतीतून दोन जणांचे जळालेले मृतदेह सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांमध्ये महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. दोन्ही मृतदेह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सापडले आहेत. एक बेडरूममध्ये आणि दुसरा बाथरूममध्ये होता, असे पोलिसांना सांगितले. 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies