Type Here to Get Search Results !

तुम्हाला पोलिस व्हायचे का? राज्यात १७ हजार ४७१ रिक्त पदे लवकरच भरणार ; भरण्यासाठीचा शासन निर्णय निर्गमित



मुंबई : महाराष्ट्रात पोलिस विभागात शिपाई संवर्गातील १७ हजार ४७१ जागांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. या भरतीची परीक्षा ओएमआर अथवा ऑनलाइन  होणार आहे. गृह विभागाने शंभर टक्के रिक्ते पदे भरण्यासाठीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. 


सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील ३१ डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत राज्याच्या पोलिस दलातील पोलिस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलिस शिपाई, बॅण्डस्मन, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. 


वित्त विभागाने ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास मान्यता दिली आहे. 


राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने  पोलिस शिपाई संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे भरण्याकरिता वित्त विभागाच्या ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीमधून सूट देण्यात आली आहे.


पोलीस भरती बाबत गृह विभागाचा शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies