Type Here to Get Search Results !

माढा लोकसभा : मोहिते पाटलांविरोधात निंबाळकर करणार आज शक्तीप्रदर्शन ; लोकप्रतिनिधींची बोलावली बैठक ; बैठकीनंतर भाजप उमेदवारी बाबत निर्णय घेण्याची शक्यता?



माणदेश एक्सप्रेस न्युज : माळशिरस : माढा लोकसभेसाठी भाजपकडून तिकीट जाहीर झालेले रणजित निंबाळकर  हे आज शक्तीप्रदर्शन करून आपली ताकद दाखवणार आहेत. त्यांनी करमाळ्याचे आमदार संजयामामा शिंदे यांच्या टेंभूर्णी येथील फार्म हाऊसवर सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली असून यासाठी तब्बल सहा किंवा पाच आमदार उपस्थित राहणार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकाकडून केला जात आहे. याशिवाय मोहिते पाटील यांच्या सर्व विरोधकांनीही या बैठकीस निमंत्रित केले जाणार असल्याचे माढा लोकसभेसाठी आज दुसरे नाट्य रंगणार असून मोहिते-पाटील विरुद्ध निंबाळकर हा वाद भाजपासाठी डोकेदुखी ठरणार आहे. 


माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील, माण खटाव येथील भाजप आमदार जयकुमार गोरे,  माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे, करमाळा येथील राष्ट्रवादी आमदार संजयामामा शिंदे आणि माळशिरस येथील भाजप आमदार राम सातपुते हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय या लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच अशांनाही बैठकीस निमंत्रित करण्यात आले आहे. 


आज निंबाळकर यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर हे चित्र बऱ्याच प्रमाणात स्पष्ट होणार असून यानंतर प्रदेश भाजपाला याबाबत निर्णय द्यावा लागणार आहे. माढ्यासाठी आता फडणवीस यांचा कस लागणार असून  मोहिते पाटील यांची नाराजी जरी दूर झाली तरी त्यांच्या समर्थकांचे मतदान भाजपकडे वळवणे हे देखील भाजपासमोर मोठे आव्हान असणार आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies