Type Here to Get Search Results !

Video पाहून तुम्ही म्हणाल काय करायचे मजबुरी आहे भाऊ.... ट्रक चालकाचा व्हिडीओ पहाच...



सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. याचा कधी मोठा फायदा होत असला तरी तोटा हि मोठ्या प्रमाणत आहे. असाच एका ट्रक ड्रायव्हर चा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो तुम्ही पहिला तर तुम्हीची म्हणाल, काय करायचे मजबुरी आहे भाऊ.


ट्रकचालकाने उन्हापासून वाचण्यासाठी असा जुगाड केलाय की पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एप्रिल महिन्यातच सूर्य इतकी आग ओकतोय की घराबाहेर पडणं मुश्कील झालं आहे. त्यात ट्रकचालक दिवसभर ट्रक चालवत असतात. याच उकाड्यापासून बचावण्यासाठी ट्रक चालकानं हा जुगाड केला आहे. आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.



चालत्या ट्रकमध्ये केली आंघोळ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक ट्रक चालक ट्रक चालवताना दिसत आहे. सध्या भारतात उन्हाळा सुरू झाला आहे. दुपारची वेळ असून उन्हाचा प्रचंड तडाखा आहे. उष्ण वातावरणापासून बचाव करण्यासाठी ट्रकचालकानं असा जुगाड केलाय की तुम्ही त्याचा विचारही करु शकत नाही.ट्रक चालक उन्हापासून वाचण्यासाठी चक्क चालत्या ट्रकमध्ये आंघोळ करताना दिसत आहे.


ट्रक ड्रायव्हर शेजारी ठेवलेल्या बादलीतून पाण्याने मग भरतो आणि स्वतःवर ओततो. एक हात ट्रकच्या स्टेअरिंगवर आहे आणि दुसऱ्या हातात पाणी आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


ट्रक ड्रायव्हरचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies