Type Here to Get Search Results !

सांगली : आरपीआयच्या अशोक कांबळेना विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणे भोवले ; पक्षाकडून नोटीस ; दोन दिवसात खुलासा करावा लागणार



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली :  पक्ष आदेश डावलून पक्षाच्या विरोधात बंडखोरी केल्यामुळे आपणांवर पक्ष शिस्तभंगाची कारवाई का करणेत येवू नये..? याबाबत दोन  दिवसाच्या खुलासा सादर करणेत यावा अशा आशयाची नोटीस जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांना दिली असल्याने अशोक कांबळे यांच्यावर कोणती कारवाई होणार का? याकडे राजकीय जाणकरांचे लक्ष लागले आहे. 


काय आहे नोटीस 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सांगली जिल्हावतीने आपणांस कळविणेत येते की,केंद्रीयमंत्री मा.रामदासजी आठवलेसाहेब यांचे आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) हा पक्ष संपूर्ण देशामध्ये मोठया ताकतीने भारतीय जनता पार्टी सोबत असून एन.डी.ए आघाडीचा घटक पक्ष आहे.

मा. रामदासजी आठवलेसाहेब हे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करणेकरिता व मा. नरेंद्र मोदीसाहेब यांना तिस-यांदा प्रधानमंत्री होण्यासाठी देशभर एन.डी.ए आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातुन घटकपक्ष या नात्याने राज्यातील प्रत्येक रिपब्लिकन कार्यकर्त्यांची महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार व त्यांना पाठींबा देणे ही नैतिक जबाबदारी असताना आपलेकडून जाणीवपुर्वक बंडखोरी करून सांगली लोकसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार श्री. विशाल पाटील यांना जाहिर पाठींबा देऊन पक्षाच्या विरोधात काम करीत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे आपणांवरती पक्ष शिस्त भंग व पक्षाचा आदेश न मानल्यामुळे कारवाई का करणेत येऊ नये..याबाबत 2 दिवसांत खुलासा सादर करणेत यावा. अन्यथा आपलेवर पक्षशिस्त भंग नियमानुसार योग्य ती कार्यवाही करणेत येईल, अशा आशयाची नोटीस देण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies