Type Here to Get Search Results !

माजी मंत्री प्रतिक पाटील यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट ; सांगली लोकसभेसाठी विशाल पाटलांना वंचितची उमेदवारी मिळणार का?



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली लोकसभा कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे विशाल पाटील यांनी जाहीर केले आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी ही शिवसेनेकडून पै. चंद्रहार पाटील (Chandrhar Patil) यांना मिळाली आहे. 


त्यातच आता विशाल पाटील यांचे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील (Pratik Patil) यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkr)  यांनी भेट घेतल्याने सांगलीच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशाल पाटील (Vishal Patil) आता वंचितच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.


वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर आता काय निर्णय घेतात? याकडे सुद्धा लक्ष असेल. या भेटीवेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. काँग्रेसने आधीच ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रात त्यांना आपला अस्तित्व ठेवायचे की नाही? दरम्यान सांगलीमध्ये शिवसेनेत ताकद नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 


प्रतिक पाटील मला भेटून गेले आहेत. त्यामुळे पुढील निर्णय लवकरच घेऊ. सध्या कुठलाही आग्रह केलेला नाही किंवा कुठलीही निर्णय दिला नसल्याचे आंबेडकर म्हणाले. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या 'यशवंत भवन' या निवासस्थानी भेट घेतली. 


यावेळी प्रकाश आंबेडकरांनी विशाल पाटलांनी उमेदवारी दाखल करावी, असा सल्ला दिला असून त्यानंतर निर्णय घेणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. प्रतीक पाटील आंबेडकरांना भेटल्याने मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies