Type Here to Get Search Results !

सांगली : ‘या’ नेत्याची आरपीआयमधून कायमस्वरूपी हकालपट्टी : पक्षविरोधी काम केल्याचा परिणाम ; जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिली माहिती




माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली :  पक्ष आदेश डावलून पक्षाच्या विरोधात बंडखोरी केल्यामुळे आपणांवर पक्ष शिस्तभंगाची कारवाई का करणेत येवू नये..? याबाबत दोन  दिवसाच्या खुलासा सादर करणेत यावा अशा आशयाची नोटीस जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांना दिली  होती. परंतु अशोक कांबळे यांच्याकडून कोणताही खुलास न आल्याने अखेर काल दिनांक २९ रोजी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी अशोक कांबळे याची पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी केली आहे.


रामदास आठवले हे देशभर एन.डी.ए आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातुन घटकपक्ष या नात्याने राज्यातील प्रत्येक रिपब्लिकन कार्यकर्त्यांची महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार व त्यांना पाठींबा देणे ही नैतिक आहे. परंतु अशोक कांबळे यांनी पक्षाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या पाठीशी राहून त्यांचा प्रचार करणे बंधनकारक असताना त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना जाहीर पाठींबा देऊन पक्षाच्या विरोधात काम सुरु केले होते.


त्यामुळे त्यांना आरपीआयच्या वतीने पक्ष शिस्त भंग व पक्षाचा आदेश न मानल्यामुळे कारवाई का करणेत येऊ नये? याबाबत दोन  दिवसांत खुलासा सादर करणेत यावा, अशा आशयाची नोटीस दिली होती. परंतु सदर नोतीशी अशोक कांबळे यांनी उत्तर न दिल्याने त्यांची पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती राजेंद्र खरात यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies