Type Here to Get Search Results !

शिंदे गट आणि अजित पवार गटा बाबत संजय राऊत यांचा मोठा दावा; म्हणाले.....

 


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला नाही. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. तसेच ‘शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही’, असा दावा केला आहे.

   


शिवसेना शिंदे गटाच्या जाहीरनाम्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “त्यांच्या जाहीरनाम्याचा तसाही काही उपयोग नाही. शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या जाहीरनाम्याचा काहीही फायदा होणार नाही. कारण दोन्ही गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही. हे मी आज स्पष्ट करत आहे. तसेही त्यांना जाहीरनामा कळत नाही, त्यांनी आधी लिहायला आणि वाचायला शिकले पाहिजे”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.



पुढे बोलताना ते म्हणाले, की, केंद्र सरकारने गुजरातमधील २ हजार मेट्रिक टन सफेद कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. यावरुनच संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, “दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा कांदा मुंबईच्याच न्हावा-शिवा पोर्टस् वरून परदेशात जाणार आहे. ऐन निवडणुकीत गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव आहे.


महाराष्ट्राचा कांदा हा सडत आहे, त्याला भाव नाही. येथे तुम्ही निर्यातबंदी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार तर लगेच बंदी केली. पण गुजरातचा पांढरा कांदा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रिय आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies