Type Here to Get Search Results !

VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही ; प्राण्यांची असो वा माणसांची आई ही आईच असते...

  


ई माणसांची असो किंवा प्राण्यांची, आई ही आईच असते. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईची सुरु असलेली धडपड पाहायला मिळते. प्राण्यांची असो वा माणसांची आई ही आईच असते, याची प्रचिती हा व्हिडीओ पाहून येईल.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कुत्र्याचं पिल्लू एका दुकानात अडकलं होतं. या दुकानाचं शटर बंद असल्यामुळे काही केल्या त्याला बाहेरच निघता येईना. ते आतमधून आपल्या आईला आवाज देत होतं. पण आई तरी त्याला बाहेर कशी काढणार? शेवटी या आईनं पिल्लाला बाहेर काढण्यासाठी आपल्या नखांनी सिंमेंटची लादी फोडली. अन् मग अक्षरश: जमिनीला भोक पाडून त्यामधून या पिल्लाला बाहेर काढलं. लक्षवेधी बाब म्हणजे कुत्र्याची नखं काही वाघ सिंहांसारखी मजबूत नसतात. मात्र त्या लहानशा नखांनी सुद्धा आईनं जमिन फोडली. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हाला सुद्धा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.



आपल्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी कुत्रा त्या जागेवरुन क्षणभरही हलला नाही. तो त्याच जागेवर बसून पिल्लाला बाहेर काढण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिला. आईची ही माया पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल. म्हणूनच म्हणतात जगात आईच्या मायेपुढे सगळं फिकं आहे.


पिल्लाचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies