Type Here to Get Search Results !

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोल्डी बरारची हत्या

 


पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोल्डी बरारची हत्या करण्यात आली आहे.असा दावा एका अमेरिकन वृत्तवाहिनीने केला आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे अमेरिकेत चित्रीकरण झाले आहे. गोल्डी बरार घराच्या बाहेर साथीदारासह उभा होता अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी गोळीबार केला. त्यात गोल्डीच्या मृत्यू झाला. अद्याप गोल्डीच्या मृत्यू झाला की त्याच्या साथीदाराचा पुष्टी मिळाली नाही.  डल्ला-लखबीर टोळीने गोल्डीच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे.


गोल्डी बरारचे खरे नाव सतींदरजीत सिंग असून ते पंजाब पार्श्वभूमी असलेला कुटुंबातील होता. पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर त्याचे नाव मीडियात चर्चेत आहे. मात्र, याआधीही त्याने अनेक गुन्हे केले आहेत. चंदीगडमध्ये चुलत भाऊ गुरलाल बरारच्या हत्येनंतर गोल्डीबरारने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. पंजाब युनिव्हर्सिटी (PU) चे विद्यार्थी नेते गुरलाल बरार यांची 11 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री चंदीगडमधील औद्योगिक क्षेत्र फेज-1 येथे असलेल्या क्लबबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 

 

29 मे 2022 रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी गोल्डी बरार यांनी घेतली होती. गोल्डीने हत्येचे कारणही सांगितले. गोल्डीच्या म्हणण्यानुसार, मोहालीतील मिड्डूखेडा येथील हत्येमध्ये सहभागी असलेल्या लोकांना मूसेवालाच्या व्यवस्थापकाने आश्रय दिला होता. नंतर मूसवालाने त्याच्या व्यवस्थापकाला मदत केली. या शत्रुत्वामुळे लॉरेन्स टोळीने मूसवाला यांची हत्या केली. पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोत येथील रणजित सिंग उर्फ राणा सिद्धूच्या हत्येतही गोल्डी बरारचा हात होता. 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies