Type Here to Get Search Results !

बापरे! Wipro कंपनीच्या या नवीन सीईओचा पगार पाहून तुम्हीही व्हाल थक्क

 


विप्रो कंपनीने नवीन सीईओ नियुक्त करतानाच त्याला इतका पगार दिला आहे. त्यामुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.एप्रिल महिना संपून एकच दिवस उलटला आहे. हा महिना कर्मचाऱ्यांच्या कामाचं मूल्यांकन करणारा असतो. त्याआधारे त्यांना पगारवाढ देण्यात येते. ॲप्रायझलच्या माध्यमातून ही लॉटरी लागते. विप्रोने यादरम्यान एक मोठा निर्णय घेतला आहे. विप्रोने नवीन सीईओची नियुक्ती केली आहे.


 सीईओ श्रीनिवास पल्लिया यांच्या नावाची घोषणा अगोदरच झाली होती. पण आता चर्चा सुरु आहे ती त्यांच्या पगाराची. त्यांना कंपनीने 60 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 50 कोटी रुपयांचं वार्षिक पॅकेज दिलं आहे. यामध्ये कंपनीकडून देण्यात येणाऱ्या इतर अनुषांगिक लाभाचा पण समावेश आहे.


बंगळुरुमधील आयटी कंपनीने शेअर बाजाराला या नवीन अपडेटविषयी माहिती दिली. यापूर्वीचे सीईओ थिअरी डेलापोर्टे यांनी अचानक राजीनामा दिला होता. त्यानंतर पल्लिया यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या वर्षी विप्रोने डेलापोर्टे यांना 80 कोटी रुपयांहून अधिकचे वार्षिक वेतन दिले होते. त्यावेळी त्याची एकच चर्चा झाली होती. विप्रोने पल्लिया यांच्या वेतनाविषयीची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. त्यानुसार, त्यांचे वेतन हे सर्व अनुषांगिक लाभासह 35 लाख डॉलर ते 60 लाख डॉलर प्रति वर्ष इतके असेल.


देशातील प्रमुख आयटी कंपन्यांमध्ये विप्रो ही एक आहे. कंपनीने गेल्यावर्षी मोठा निर्णय घेत अपर्णा सी अय्यर यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी टाकली. त्यांना चीफ फायनेन्शिअल ऑफिसरची जबाबदारी दिली. अय्यर या 2003 पासून विप्रोसोबत जोडल्या गेल्या आहेत. सिनिअर इंटरनल ऑडिटर म्हणून त्या रुजू झाल्या होत्या. कंपनीत त्यांनी 20 वर्षे सेवा बजावली आहे. त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर कामगिरी बजावली आहे. जतीन दलाल यांनी सीएफओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर अय्यर यांची नेमणूक करण्यात आली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies