लोटेवाडीत मनसेच्या वतीने २००० मास्कचे वाटप 

लोटेवाडीत मनसेच्या वतीने २००० मास्कचे वाटप 


लोटेवाडीत मनसेच्या वतीने २००० मास्कचे वाटप 
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : राज्यामध्ये कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव  झपाट्याने  वाढत असून  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मनसेचे सांगोला तालुकाध्यक्ष अक्षय विभूते यांनी लोटेवाडी ता. सांगोला, जि. सोलापूर गावामध्ये २००० मास्कचे वाटप आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, रास्तभाव धान्य दुकान व  गावातील ग्रामस्थांना वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.  मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या आदेशाने व विनोद बाबर याच्या सहकार्याने लोटेवाडी गावामध्ये मनसेच्या वतीने हे मास्क वाटप करण्यात आले. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष अक्षय विभुते, पोलीस पाटील जयश्री सांवत, समाधान बोडरे, लोटेवाडीचे शाखा अध्यक्ष प्रविण सावंत, शाखा उपाध्यक्ष महेश विभुते, शाखा प्रमुख  संजय सावंत, ऋषीकेश सावंत, महेश विभुते, शुभम सावंत, फारुक मुलाणी, आदी उपस्थित होते.


दैनिक माणदेश एक्सप्रेसच्या बातम्या whatasapp वर Free मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


Post a comment

0 Comments