Type Here to Get Search Results !

कराड तालुक्यातून कडेगाव तालुक्यात येणारे रस्ते बंद ; केवळ चिपळूण ते पंढरपूर व मल्हारपेठ ते पंढरपूर हे दोन्ही मार्ग सुरू


कराड तालुक्यातून कडेगाव तालुक्यात येणारे रस्ते बंद ; केवळ चिपळूण ते पंढरपूर व मल्हारपेठ ते पंढरपूर हे दोन्ही मार्ग सुरू
माणदेश एक्सप्रेस न्युज
कडेगाव/प्रतिनिधी : कराड शहरातील कृष्णा हॉस्पीटल येथील सिव्हिल विभागात काम करणाऱ्या कामगारांना कोरोनाचा लागण झाल्याने एक कामगार येतगाव ता. कडेगाव येथील आहे. तर अनेक जण कराड तालुक्यात नोकरी निमित्ताने जात आहेत. यातील बहुतांश वेगवेगळ्या दवाखान्यात काम करीत आहेत. यामुळे कडेगाव पोलिस यांनी केवळ आप्तकालिन परीस्थितीसाठी केवळ दोनच रस्ते सुरु आहेत.


हे ही वाचा :- बांधकाम कामगारांच्या खात्यावर (DBT) व्दारे दोन हजार रूपयांचा थेट लाभ : सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव ; बांधकाम कामगारांनी दलालांच्या अथवा एंजटाच्या भूलथापांना बळी पडू नये


याबाबतीत अधिक माहिती अशी की, येतगाव येथील एकजण कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे सिव्हिल विभागात काम करीत होता. त्यास कोरोनाची लागण झाली. त्यांनी प्राथमिक उपचार कडेगाव तालुक्यात घेतले होते. अनेकांच्या संपर्कात आला होता. यामुळे कडेगाव तालुक्यात भितीचे वातावरण आहे. तसेच कृष्णा हॉस्पीटल येथे कडेगाव शहर व तालुक्यातील अनेकजण तसेच खाजगी दवाखान्यात कामाला जात आहेत. तसेच खंबाळे औध येथे पोलिसांनी कडक धोरण ठेवल्याने लोक शामगाव खिंडीतून मोठ्या प्रमाणावर लोक कडेगाव तालुक्यात येत आहेत. यामुळे बोंबाळेवाडी तसेच करांडेवाडी येथून कराड तालुक्यातून येणारे रस्ते पुर्णपणे जे.सी.बी मशिनव्दारे चर काढून बंद करण्यात आले आहेत.
एकंदरीत कराड तालुक्यातून कडेगाव तालुक्यात येणारे मुख्य व सर्व खुश्कीचे स्ते कडेगाव पोलिसांनी आज पुर्णपणे बंद केले केवळ चिपळूण ते पंढरपूर व मल्हारपेठ ते पंढरपूर हे दोन्ही मार्ग सुरू ठेवले आहेत. कडेगाव ते कराड सर्व सिमा बंद केलेल्या आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies