विधानपरिषदेला भाजपच्या डॉ. अजित गोपछडे यांचा अर्ज मागे ; या डमी उमेदवाराला अंतिम क्षणी उमेदवारी 

विधानपरिषदेला भाजपच्या डॉ. अजित गोपछडे यांचा अर्ज मागे ; या डमी उमेदवाराला अंतिम क्षणी उमेदवारी 


विधानपरिषदेला भाजपच्या डॉ. अजित गोपछडे यांचा अर्ज मागे ; या डमी उमेदवाराला अंतिम क्षणी उमेदवारी 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
मुंबई : विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये रंगत येत असून भाजपने ऐनवेळी विधानपरिषदेचा उमेदवार बदलला  असून डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगून दोन वर्षापुर्वी राष्ट्रवादी कडून ऐनवेळी उमेदवारी जाहीर झालेले व लगेच उमेदवारी नाकारणारे पंकजा मुंडें समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी दिली आहे. गोपछडे यांनी 8 मे रोजी आपला अर्ज भरला होता, तर काल शेवटच्या दिवशी रमेश कराड यांनी आपली उमेदवारी दाखल केली. 
दिनांक ८ रोजी अजित गोपछडे यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके यांचे उमेदवारी अर्ज भरले होते. त्याशिवाय डमी अर्ज म्हणून रमेश कराड आणि संदीप लेले यांचे अर्ज भरण्यात आले होते. परंतु आता आता डमी असलेले रमेश कराड हे मुख्य उमेदवार म्हणून भाजपने निवडले आहे.
रमेश कराड यांनी दोन वर्षापूर्वीही विधानपरिषद निवडणुकीत मोठी खेळी केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करुन विधानपरिषदेचं तिकीट मिळवलं होतं. मात्र अवघ्या पाच दिवसात त्यांनी माघार घेत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करुन, धनंजय मुंडे यांची मोठी अडचण केली होती. कारण त्यावेळी राष्ट्रवादीकडे उमेदवारच न उरल्याने, अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली होती. त्यानंतर आताही ऐनवेळी भाजपने रमेश कराड यांना मैदानात उतरवलं आहे. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत. 2018 मध्ये बीड-उस्मानाबाद-लातूर या मतदारसंघातून निवडायच्या विधानपरिषद जागेसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला होता. मात्र ऐनवेळी माघार घेऊन त्यांनी भाजपच्या सुरेश धस यांना पाठिंबा दिला होता.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस


 


Post a comment

0 Comments