माणदेशी चॅम्पियन्स चा अनोखा उपक्रम ; खेळाडूंना पौष्टिक आहार, मास्क, साबण आणि दोन झाडे वाटप


माणदेशी चॅम्पियन्स चा अनोखा उपक्रम ; खेळाडूंना पौष्टिक आहार, मास्क, साबण आणि दोन झाडे वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : माणदेशी चॅम्पियन्स ने जवळ पास २८० खेळाडूंना पौष्टिक आहार, मास्क, साबण आणि दोन झाडे अशा वस्तू ह्या आणीबाणी आणि महामारी च्या काळात तालुक्यातील खेळाडूंना दिल्या. माणदेशी चॅम्पियन्स चे अध्यक्ष प्रभात सिन्हा म्हणाले, लॉकडाऊन मुळे  ग्रामीण भागतील गरीब व गरजू खेळाडू ना पौष्टिक आहार उपलब्ध नाही. सध्याच्या स्थिती मध्ये कोचिंग सुधा मिळू शकत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर राष्ट्रीय खेळाडू रेश्मा केवटे, सरिता भिसे, चेतन चव्हाण ह्या सारखे खेलो इंडिया विजेते खेळाडू सध्याला घरी बसून आहेत, काही तर दुसऱ्याच्या शेतात कामाला जातायत. ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा खेळाडू ची ही परिस्थिती आहे. कोरोना मुळे पुन्हा खेळायच्या स्पर्धा कधी चालू होतील ह्याचा अंदाज ही नाही. ११ वेळा राष्ट्रीय कुस्ती मल्ल काजल जाधव कुस्त्या खेळून पारितोषिक जिंकून  घराचे नाव उंचावत होती, सध्या कुस्त्या बंद असल्यामुळे तेही बंद. तसेच तिचे जिंदाल IIS ह्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात निवड ही झाली होती. कोरोंना मूळे तेही लांबले गेले. रेश्मा केवटे ही हाफ मॅरेथॉन पट्टू जवळ पास दर आठवड्याला एक हाफ मॅरेथॉन भारत भर पळून चांगले पैसे कमवायची तर तेही कोरोंना मुळे बंद झाले. ह्या सर्व परिस्थिती वरून असे लक्षात येते की, खेळावर ह्याचा खूप परिणाम होणार आहे. कोचिंग नाही, पोष्टीक आहार नाही व पुरेसे पैसे ही नाहीत. हे सर्व विचारात घेता माणदेशी चॅम्पियन्स ने प्रत्येक मुलाला खजूर, अंडी, केळी, साबण, आणि मास्क ह्याचे वाटप केले. जवळपास २८० खेळाडूंना ह्याचा लाभ झाला. त्याच बरोबर सध्याच्या काळात वेळ घालवण्यासाठी दोन झाडे ही लावायला दिली आहेत. एक आंबा आणि जांभूळ व चिंच. जे खेळाडू झाडांची व्यवस्थित निगा व पालनपोषण करतील त्यांना माणदेशी चॅम्पियन्स तर्फे योग्य त्या वेळी शुज आणि टीशर्ट ही दिला जाईल.
ह्याच बरोबर माणदेशी चॅम्पियन्स काही राष्ट्रीय खेळाडूंचे  मानसिक मनोबल वाढवण्यासाठी त्यांचे जागतिक ऑलिम्पिकपटू व जागतिक बास्केटबॉल खेळाडू ह्यांच्या बरोबर झूम सेशन ही घेण्यात येणार आहेत. ह्या मध्ये जागतिक कुस्ती पटू क्युबा चे २००४ ओलंपिक सुवर्ण पदक विजेते यांद्रो, त्याच बरोबर ऑलिम्पिक जागतिक ब्रांझ पदक विजेते एमा कोबुर्न ३००० स्तीपल चेस आणि काही NBA खेळाडू सहभागी होणार आहेत. ह्या सर्व कार्यामध्ये माणदेशी चॅम्पियन्स चे खेळाडू आणि कोचेस बानू,  महलिंग खांडेकर, राजू, आणि श्री लोखंडे यांचे योगदान लाभले आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Join Free Telegram माणदेश एक्स्प्रेस


Twitter ला फॉलो करा माणदेश एक्स्प्रेस


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad