या हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारे अभ्यासक्रम देण्याचा निर्णय ; शासनाने परवानगी दिल्यास १० वी चे वर्ग चालू करण्याची शिक्षकांची तयारी 

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : राजारामबापू हायस्कूल आटपाडी ता. आटपाडी, जि. सांगली येथे संस्थेचे चेअरमन रावसाहेब (काका) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शिक्षक व कर्मचारी यांची मीटिंग सोशल डिस्टनसिंग चा नियम पाळत पार पडली.  यात प्रशालेतील सर्व विद्यार्थ्याना मोबाइलद्वारे अभ्यास देऊन तो पूर्ण करून घेणे बाबत निर्णय करण्यात आला. तसेच शासनाने परवानगी दिल्यास फक्त इयत्ता 10 वी मधील विद्यार्थ्याचा वर्ग चालू करण्याची तयारी सर्व शिक्षककांनी दर्शवली.
विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकनान होवू नये याची दक्षता घेण्याचे ठरवण्यात आले. सुरुवातीला कोरोना मुळे मृत्यु पावलेल्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच शासनाने लॉकडाऊनला पर्याय शोधून जनजीवन सुरळीत करण्याचा मार्ग शोधावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक आर.एस. पाटील, जेष्ठ शिक्षक प्रदीप पाटील यांच्या बरोबर सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. स्वागत बाळासाहेब चव्हाण यांनी केले तर आभार दादासाहेब मोटे यांनी मानले.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Join Free Telegram माणदेश एक्स्प्रेस

Post a comment

0 Comments