पिंटू जाधव, संतोष गायकवाड व अजय घाडगे यांच्यावर सांगोला पोलीस ठाणेमध्ये सावकरकीचा गुन्हा दाखल ; १५ लाखाचे घेतले ३१ लाख १० हजार रुपये व १५ लाख ७५ हजाराचा चेक


पिंटू जाधव, संतोष गायकवाड व अजय घाडगे यांच्यावर सांगोला पोलीस ठाणेमध्ये सावकरकीचा गुन्हा दाखल ; १५ लाखाचे घेतले ३१ लाख १० हजार रुपये व १५ लाख ७५ हजाराचा चेक 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला/प्रतिनिधी :  कडलास ता. सांगोला येथील सावकरांनी पठाणी व्याजाचा कळस गाठला असून १५ लाख रुपयांसाठी तब्बल ३१ लाख १० हजार रुपये उकळले असून याबाबत सांगोला पोलीस स्टेशनला पिंटू जाधव, संतोष गायकवाड व अजय घाडगे यांच्या विरुद्ध सावकरकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महेश अरविंद माने,रा.जवळा,ता.सांगोला यांनी सन २०१८ मध्ये पैशाची आवश्यकता असल्याने मौजे.कडलास ता.सांगोला येथील पिंटू जाधव यांचेकडून १५ लाख रुपये ३ टक्के व्याजाने घेतले होते. त्याकरीता त्यांनी आपले जवळा,ता.सांगोला येथील त्यांचे मालकीचे गट नं. ११४५/२ मधील घर तारण देण्याचे ठरले होते. त्यावेळी पिंटू जाधव यांनी आपला मित्र अजय संभाजी घाडगे,रा. जवळा,ता.सांगोला यांचे नावे सदरचे घर नावावर करुन घेतले होते. तेंव्हा त्याने घर तारण बाबत उल्लेख केला नाही. त्यानंतर महेश माने यांनी जानेवारी २०२० रोजी पर्यत व्याजाचे ४,६०,000/- रुपये व मुद्दल म्हणून २६,५०,000/- रुपये असे एकूण ३१,१०,000/- रुपये दिलेले असताना पिंटू जाधव यांनी महेश माने यांचेकडे जादा रक्कमेची मागणी केली. त्याकरीता पिंटू जाधव त्याचा साथीदार संतोष शामराव गायकवाड,रा.कडलास,ता.सांगोला यांनी त्यांचे घरी जावून शिवीगाळी दमदाटी केली. पिंटू जाधव यास ३१,१०,000/- रुपये देवून देखिल घर परत फिरवून दिले नाही म्हणून त्यांचे सासरे, आई, मेहूणे असे पिंटू जाधव व अजय घाडगे यांचेकडे विनंती करण्यास गेलेवर त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली आहे. तसेच घर फिरवून देण्याकरीता त्यांनी विलास गावडे यांचेकडून महेश माने यांनी सन २०१७ -१८ मध्ये घेतलेल्या १० लाख रुपये व्यवहारांचा त्यांचेशी काहीही संबंध नसताना विलास गावडे याचेकडून घेतलेले पैसे माझेच आहेत.मला त्या व्यवहारातील मुद्दल १०,७५,000/- रुपये व त्याच्या व्याजा पोटी ५ लाख असे १५,७५,000/- रु.चा चेक दे नाहीतर घराची खरेदी फिरवून देणार नाही असे म्हणून महेश माने यांचे मेहूणे संदीप संभाजी पवार,रा.वाटंबरे,ता.सांगोला यांच्या युको बँक शाखा /०४/२०२० रोजीचा
१५,७५,000/- रुपयांचा जबरदस्तीने लिहून घेतला व घर मेव्हूण्याचे नावे फिरवून दिले. तसेच चेक वटल्याशिवाय व्यवहार पुर्ण होवू देणार नाही अशी धमकी देवून तहसिलदार सांगोला व तलाठी जवळा यांना नोंद होवू नये म्हणून तक्रारी अर्ज देवून महेश माने यांना मानसिक त्रास दिलेला आहे. सदर पिंट्र जाधव रा.कडलास,ता.सांगोला व अजय घाडगे,रा.जवळा,ता.सांगोला यांचेकडे व्याजाने रक्कम देण्याचा कोणताही कायदेशिर परवाना नसताना त्यांनी महेश माने यांचेसोबत व्यवहार करुन ठरलेल्या रक्कमे पेक्षा जास्त पैसे वसल केले ते करण्या करीत त्यांचे घरी जावून शिवीगाळी. दमदाटी तसेच त्यांचे नातेवाईकांना मारहाण करणे असे प्रकार केले आहेत. त्यामुळे महेश माने यांनी सांगोला पोलीस ठाणेस पिंटू जाधव,संतोष गायकवाड,रा.कडलास व अजय घाडगे यांचे विरुध्द खाजगी सावकारची तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झालेला असून त्याचा तपास पोहेकॉ/ करचे हे करीत आहेत. 
पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगोला तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन केले आहे की, जर अशा प्रकारे कोणी खाजगी व बेकायदेशिर सावकारी करुन त्रास देत असेल तर स्वत: पोलीस ठाणेस येवून संबंधित सावकारा विरुध्द तक्रार द्यावी.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Join Free Telegram माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad