मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माणदेश एक्स्प्रेस कडून त्यांना गीतामधून शुभेच्छा


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माणदेश एक्स्प्रेस कडून त्यांना गीतामधून शुभेच्छा 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणी विचार ही केला नव्हता की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील म्हणून! आणि या वर्षीचा वाढदिवस ते मुख्यमंत्री म्हणून साजरा करतील ! पण, राजकारणात काहीही होऊ शकते. कोणी कोणाचेही मित्र होऊ शकतात. कुठलीही समीकरणं जुळू शकतात. 


 अशा या मुख्यमंत्र्यांना माणदेश एक्सप्रेस फिल्म निर्मित, समाधान ऐवळे (सर) यांनी शब्दबद्ध केलेले व त्यांनीच संगीत दिलेले तर बोधी रेकॉर्डिंग स्टुडीओ आटपाडी येथे रेकॉर्डिंग केलेले गाणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पुन्हा शेअर करीत आहोत.
गाणे पाहण्यासाठी क्लिक करा


 
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सांगायचे म्हंटले तर , महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता कधीच येणार नाही असा छातीठोक दावा भलेभले राजकीय चाणक्यद करीत होते. परंतू बाळासाहेबांनीही जे अशक्य  आहे ते शक्या करून दाखविले. त्याच बाळासाहेबांचे राज्यात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न होते. मात्र ते असे पर्यंत झाले नाही. बाळासाहेब थकले होते. अर्थात शिवसेनेची धुरा उद्धव यांच्या खांद्यावर होती. त्यांनी पित्याचा वारसा भक्कमपणे चालविला. मुळात बाळासाहेब आणि उद्धव अशी तुलनाही करता येणार नाही. बाळासाहेब बाळासाहेबच होते. उद्धव हे कधीच बाळासाहेब बनू शकणार नाहीत. हे सर्वमान्यच. उद्धव ठाकरे हे मवाळ नेतृत्व आहे. ते कधीच आग ओखणारे भाषण करीत नाहीत. संयम किंवा थंडा करके खाव हेच त्यांच्या राजकारणाचे सूत्र राहिले आहे. 
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातील राजकारणात एक शक्तीशाली नेते म्हणून ओळखले जात आहेत. आपल्या संयमी नेतृत्वाने त्यांनी भल्याभल्यांना भूरळ घातली आहे जशास तसे उत्तर देण्यासही त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. म्हणूनच नरेंद्र मोदी, अमित शहा असोत की शरद पवार, देवेंद्र फडणवीस. ते कोणालाही शिंगावर घेतात. पण, त्यांची स्टाईल वेगळी आहे. राजकारण करीत असताना त्यांनी वैर घेतले नाही किंवा आकसही धरला नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवले. मैत्री, दोस्ती, स्नेह नेहमीच जपला. अशा या मुख्यमंत्र्यांना दैनिक माणदेश एक्सप्रेस परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!!!!


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad