बोगस डॉक्टरला कोरोनाची लागण 


बोगस डॉक्टरला कोरोनाची लागण 
जत : बोगस डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याची घटना जत तालुक्यातील बाज येथे घडली असून याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी माहिती दिली आहे.


 अंकले येथील 40 वर्षीय व्यक्ती बुधवारी कोरोना बाधित आढळून आला होता. त्याआधी त्यांच्यावर बाज येथील एका बोगस डॉक्टरकडे उपचार केले होते. त्याचा अहवाह पॉझिटिव्ह आल्याने बाजमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे बाज हायरिस्कवर आले आहे. बाजमधील या बोगस डॉक्टराकडे उपचार केलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्याचे कोणतेही रेकार्ड नसल्याने बाज मधील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

Previous Post Next Post